प्रशांत कोराटकर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) न्यायालयाने आज (दि. 30) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर प्रशांत कोरटकरने तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने प्रशांत कोरटकर झटका दिलाय. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे नागपूर येथील त्याच्या घरी दाखल झाल्यानंतर कोरटकर घरी नसल्याचे आढळले होते. जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता. कोल्हापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून त्याला अटक केली होती.
यानंतर कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावली होती. आज प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपली. यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच प्रशांत कोरटकरने कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर एक एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. आता एक तारखेच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरवर न्यायालयाच्या आवारात आतापर्यंत दोन वेळेस हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरटकारला पहिल्यांदा न्यायालयात हजर केले असता त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्यांदा कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला होता. शुक्रवारी कोरटकरला न्यायालयाच्या मागच्या दाराने त्याला बाहेर नेले जात होते. त्यावेळी वकिल अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला केला होता. न्यायालयाचा मागील दरवाजा कँटिनच्या दिशेने उघडतो. तिथे वकील अमितकुमार भोसले आधीपासूनच उभे होते. कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल विचारत भोसले कोरटकरवर धावून गेले. त्यांनी कोरटकरवर झडप घातली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत पोलिसांना सूचना द्या, अशी विनंती कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी कोर्टाकडे केली. सौरभ घाग यांच्या विनंतीनंतर कोर्टाने पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..