राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले . पाली येथून उड्डाण करताच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मागील भागात स्फोट झाला आणि मागच्या भागातून धूर येऊ लागला. सुदैवाने, पायलट ते पाहिले आणि मोठ्या हुशारीने त्याने सुरक्षित लँडिंग केले. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. राजस्थानमधील पाली येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राज्यपाल जयपूरला परतत होते.
हेलिकॉप्टर खाली उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी राज्यपाल यांना सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले आणि त्यांना रस्त्याने रवाना केले. त्याचबरोबर हेलिकॉप्टरमध्ये स्फोट आणि धूर निघत असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. ही घटना राज्यपालांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक मानली जात आहे.
हेलिकॉप्टर खाली उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले आणि त्यांना रस्त्याने रवाना केले. त्याचबरोबर हेलिकॉप्टरमध्ये स्फोट आणि धूर निघत असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. ही घटना राज्यपालांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक मानली जात आहे.
सुदैवाने, या अपघातात राज्यपाल सुखरूप बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरच्या मागील भागातून धूर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यपाल तिथून गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या इंजिनची तपासणी सुरू केलीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी नियमितपणे तपासले जात होते की नाही हे देखील पाहिले जात आहे.
पाली हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरमध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे बसले. त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करताच एक छोटासा स्फोट झाला आणि मागच्या भागातून धूर येऊ लागला. यामुळे खाली उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आणि इतर लोकांमध्ये खळबळ उडाली. सुदैवाने, पायलटलाही धूर दिसला आणि त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून हेलिकॉप्टर उतरवले. या घटनेत राज्यपाल थोडक्यात बचावले.