देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींवर सतत नजर ठेवत राहण्यासाठी या लाईव्ह ब्लॉगवर अपडेट राहा. आजच्या दिवशी महत्त्वाच्या घटना घडत आहेत. म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात महत्त्वाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याशिवाय, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि प्रशांत कोरटकर यांच्याबाबतच्या घडामोडींवरही आमची नजर असेल.
ताज्या अपडेटसाठी या ब्लॉगला फॉलो करत राहा!
"गुढी पाडव्याचा आणि नवीन वर्षाच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा" पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा..."गुढी पाडव्याचा आणि नवीन वर्षाच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा" मराठीतून दिल्या शुभेच्छा...
आज मला इथे येण्याचं भाग्य लाभलं... आजचा दिवस विशेष आहे. आजपासून नवरात्री पर्व सुरू होत आहे..
भगवान झुलेला यांचा अवतरण दिवस आहे..
100 वर्ष पूर्ण होत आहे..
आज हेडगेवार आणि गुरुजी याना नमन करण्याचे भाग्य लाभले..
दीक्षाभूमीत जाऊन बाबासाहेब आबेडकर याना नमन केलेत.
ज्ञान गैरव आणि मानवसेवा ही कना कानात वास करते, माधव नेत्रालाय अनेक दशकापासून सेवा करण्याचं काम करत आहे. लोकांच्या आयुष्यात प्रकाश आला.. नवीन निर्मना झाल्यावर हजारो लोकांच्या आयुष्यात अंधकार सुरू होऊन प्रकाश येईल..
माधव नेत्रालयाशी जुडलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो..
अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.
Live : गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा, पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिला सल्ला"गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा"
पुणे पोलीस आयुक्तांनी गुढीपाडव्यानिमित्त गुन्हेगारांना दिला सल्ला
शहरात शांतता राहावी यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दगडूशेठ गणपती चरणी केली प्रार्थना
श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गुढीपाडव्यानिमित्त पोलीस आयुक्तांनी केला अभिषेक
तर पत्नीसह आनंदाची गुढी उभारून
मराठी नववर्षाच्या निमित्ताने पुणे शहरातील गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा अशी तंबीच देण्यातवलीय
१२१:अमितेश कुमार (पुणे पोलिस आयुक्त)
Beed Live : बीडमध्ये मशिदीच्या आवारात स्फोट, पोलिसांकडून शांततेचं आवाहनबीडमध्ये मशिदीच्या आवारात स्फोट झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Pune Live : पुण्यातील आप्पा बळवंत चौकातून निघाली शोभायात्रापुण्यातील आप्पा बळवंत चौकात शोभायात्रा निघाली आहे
या शोभायात्रेमध्ये तीन वेगळे रथ
एका रथावर अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा असा हा रथ
शोभायात्रा तांबडे जोगेश्वरी जवळ आली
Kolhapur Live : प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीप्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचे वकील आजच जामीनासाठी अर्ज करणार आहेत.
Kolhapur Live : प्रशांत कोरटकरला 11 वाजता न्यायालयात हजर करणारछत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरची आज पोलिस कोठडी संपत असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
Nagpur Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादनपंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी आरएसएस मुख्यालयात हेडगेवार स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
Jaipur Live : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेराजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले . पाली येथून उड्डाण करताच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मागील भागात स्फोट झाला आणि मागच्या भागातून धूर येऊ लागला. पायलटने तात्काळ सुरक्षित लॅंडिग केल्याने मोठा अनर्थ टळला.
Nagpur Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयात हेडगेवार स्मृतीस्थळाला केले अभिवादनपंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात हेडेगवार स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.
कागल-निढोरी राज्य मार्गावरील दूधगंगा नदीवर भीषण अपघातकागल-निढोरी राज्य मार्गावर रात्री 11 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. 45 फूट लांबीचा कंटेनर संरक्षक कठडा तोडून थेट दूधगंगा नदीच्या पात्रात कोसळला. या अपघातात कंटेनरचे दोन तुकडे झाले असून, चालक जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे.
Gudhi Padwa Live: गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्रात अनेक शहरात भव्य शोभायात्रागुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आज भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादसह अनेक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि आकर्षक रथांवर सजवलेल्या गुढ्यांच्या सोहळ्यात उत्साह पाहायला मिळाला. महिलांनी खास नऊवारी साड्यांमध्ये ‘हळदी-कुंकू’ सोहळ्याचे आयोजन केले, तर तरुणांनी भगवे फेटे बांधून पारंपरिक गजर करत सहभाग नोंदवला. संपूर्ण महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.
Latest Marathi News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरातपंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुराच्या दौऱ्यावर असून, विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मोदी यांच्या उपस्थितीत विविध विकास प्रकल्पांवर चर्चा होणार असून, ते जनतेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे नागपूर आणि विदर्भाच्या विकासाला नवा वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.