आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा, तर सनरायझर्स हैदराबादचा हा तिसरा सामना आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. तर सनरायझर्स हैदराबादने पहिल्या सामन्यात राजस्थानचा धुव्वा उडवला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सुरुवातीच्या टप्प्यात विजयी ट्रॅक कायम ठेवल्यास फायदा होतो. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. दुपारचा खेळ नेहमीच गरम असतो. आम्ही काही मोठे स्कोअर केले आहेत. आम्हाला दोन्ही बाजूंनी काळजी नव्हती. गेल्या सामन्यात आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरीपासून खूप दूर होतो. मुले अजूनही सकारात्मक आहेत. झीशान संघात आला आहे .’
अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हीही फलंदाजी केली असती. आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही येथे एक सामना खेळलो आहोत, आम्ही आमच्या योजनांवर काम करत होतो. गोलंदाजी युनिट म्हणून आम्हाला धाडसी राहण्याची गरज आहे. आमच्याकडे काही योजना आहेत. एक बदल केला असून समीर रिझवी बाहेर गेला आहे आणि केएल राहुल आता आला आहे.’ केएल राहुलचा दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पणाचा सामना आहे. पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे गैरहजर राहिला होता. मात्र आता त्याने कमबॅक केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी