आयपीएल 2025 स्पर्धेतील 12 वा सामना 31 मार्चला कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात अष्टपैलू सुनील नरीन खेळला नव्हता. पण या सामन्यापूर्वी सुनील नरीन फिट झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सामन्याच्या एक दिवस आधी ही माहिती दिली आहे. इतकंच काय तर खेळपट्टीच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार चंद्रकांत पंडित यांनी सुनील नरीन बाबत सांगितलं की, ‘सुनील फिट आहे. तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे. शनिवारपासूनच तो सराव करत आहे. त्यामुळे तो ठीक आहे.’
कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि पिच वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे बोलला होता की, ईडन गार्डनमध्ये मनासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा तसा काही फायदा मिळाला नाही. चंद्रकांत पंडित यांना याबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्यांनी या विषयाला बगल देत म्हणाले की, जी खेळपट्टी दिली जाईत, त्यावरच खेळावं लागेल.
चंद्रकांत पंडित यांनी सांगितलं की, ‘एक प्रशिक्षक म्हणून आणि एक टीम म्हणून आम्हाला जी खेळपट्टी दिली जाते त्यावर खेळतो. यावर पूर्णपणे क्यूरेटरचं नियंत्रण असतं. पण आता आमचं लक्ष सोमवारी होणाऱ्या सामन्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी त्याबाबत विचार करत नाही. सोमवारचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.’
कोलकाता नाईट रायडर्स संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, आंगकृष्ण रघुवंशी, मनीष नॉरजे, एन रॉबनी, लूक, एन रॉबनी, लूक, एन. सुनील नरेन, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया.