Maharashtra News Live Updates: जळगावच्या पाचोरा येथे ट्रकमध्ये चालकाच्या केबिन खाली आढळून आला तब्बल आठ फुटांचा अजगर
Saam TV April 01, 2025 07:45 AM
आवास योजनेत घर मिळवून देतो सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

पी एस आर डी ए ने बांधलेल्या पंतप्रधान आवास योजनेत घर मिळवून देतो म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील जया ढाके ह्या एजंट महिलेने शेकडून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे .

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पी एस आर डी ए ने पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हजारो घर बांधली आहेत. या घरांची सोडत ऑन लाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. मात्र पी एस आर डी ए च्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून तुम्हाला घर मिळवून देते असं आमिष दाखवून जया ढाके ह्या एजंट महिलेने शेकडून नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे.

Badlapur: कुळगांव-बदलापूर नगरपालिका झाली पेपरलेस

ठाणे जिल्ह्यातील कुळगांव-बदलापूर नगरपालिका ही एमएमआर परिसरातील पहिली पेपरलेस नगरपालिका बनलीय. पालिकेनं ई-ऑफिसची 100 टक्के अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण करून पारंपरिक कागदी प्रणालीला पर्याय म्हणून “ई-ऑफिस” हा नवा डिजिटल मार्ग अवलंबलाय. त्यामुळे आता विविध विभागांमधील दस्तऐवज आणि माहिती ऑनलाइन मिळणार आहे.

कोल्हापूरातल्या गांधीनगर मध्ये चोरी करताना एकाला रगेंहाथ पकडले

चोरटा गारगोटीतल्या एका सौंदर्य शॉपी चा मालक

अमित कवेकर असे चोरट्याचे नाव

गांधीनगर मधल्या एका नोव्हेल्टी शॉप मधील साहित्याची चोरी करताना रंगेहाथ सापडला

दुकानातील छोटे-मोठे साहित्य आपल्या पँटच्या खिशात तसेच अंतर्वस्त्रात लपवले

पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्याने चोरलेले साहित्य एका मागोमाग एक काढलं बाहेर

संबंधित चोरट्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा

सोलापुरात आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा

राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व धनगर बांधव एकत्र येत करण्यात येतोय सत्कार

या सत्कार समारंभाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजातील आमदार असणार आहेत उपस्थित

सोलापुरातील हेरिटेज लॉन्स गार्डन मध्ये पार पडतोय भव्य नागरी सत्कार सोहळा

त्यामुळे या कार्यक्रमात राम शिंदे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Railway News: रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस मध्ये चोरी

प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल ,आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहे. सहिमत शेख असे या चोरट्याचे नाव असून तो नवी मुंबईचा राहणार आहे. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले आहे. पुढील तपास रेल्वे क्राईम ब्रँच पोलीस करीत आहेत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नोटबंदी काळातील 25 कोटींच्या नोटा शिल्लक

या नोटा अधिकृत आहेत त्या कुठून आल्या याचा डेटा सुद्धा आहे

त्यामुळे आरबीआयला त्या नोटा स्वीकाराव्याच लागतील

या संदर्भात न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे मात्र जास्त याचिका असल्यामुळे निर्णय यायला वेळ लागतोय

गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देखील कोट्यावधी रुपये अडकून पडलेत

नांदेडच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांतर्फे नमाज पठण

देशभरात ईद आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात देखील ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मुस्लिम बांधवां तर्फे नांदेडच्या ईदगाह मैदानावर ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले.त्यानंतर विश्वशांती साठी प्रार्थना करण्यात आली.नमाज पठण झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

अनेक भागातील पाणीपुरवठा राहणार गुरुवारी बंद

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी केला जाणार पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

Ahilyanagar: अहिल्यानगर येथे रमजान ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठण...

नमाज पठणच्या वेळी येऊ घातलेल्या 'वक्फ बोर्ड दुरुस्ती' विधेयकाला मुस्लिम समाजाने केला विरोध

खिशाला कागदी फलक आणि हातात फलक घेऊन केला निषेध ...

शहरातील ईदगाह मैदानावर झाले सामूहिक नमाज पठण...

वक्फ बोर्डची जागा ही खासगी जागा असल्याने त्यावर कुणी ताबा मारू नये, मुस्लिम युवकांची मागणी...

Kolhapur News: कोल्हापुरात रमजान ईदचा उत्साह

मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण

शेकडो मुस्लिम बांधवांकडून कोल्हापुरात नमाज पठण

खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडूनही मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन इच्छा शुभेच्छा

Dharashiv News: धाराशीवमध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी केली सामुहिक नमाज अदा

धाराशिव मध्ये रमजान ईदच्या निमित्त शहरातील दर्गा मैदान आणि ईदगाह मैदान वर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा करत रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.दरम्यान जिल्ह्यातील खासदार,आमदार लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांसह,पोलिस अधीक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.सर्वच मुस्लिम बांधव छोट्या बालबच्चा सह रमजान ईदच्या पवित्र नमाज साठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले तर पोलीसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता.

मनपाने थकीत कर वसुलीसाठी आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवत राबवली वसुली मोहीम...

थकीत कर वसुलीसाठी नवी मुंबई मनपा कडून थक बाकी असलेल्या आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवून वसुली मोहीम राबविण्यात येतेय. तुर्भे विभाग कार्यालयाकडून तुर्भेतील हावरे कमरशिशियल कोम्प्लेक्स मध्ये थकीत कर वसुलीसाठी आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवण्यात आले. 1 करोड 25 लाख रुपयांच्या मालमत्ता कर थक बाकीची नोटीस मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेय. यापुढे मालमत्ता कर थकवल्यास अश्याच स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा मनपा अधिकाऱ्यांनी दिलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोडूसर होता..

- वाल्मीक कराड याचा आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे..

- इंडियन मोशन पिक्चर प्रोडूसर असोसिएशन चे आयडी कार्ड आहे.

- बी आर जे फिल्म प्रोडक्शन

- मेंबरशिप न..23480

- आजीवन सभासद

- वाल्मीक कराड यांच्या बीकेसी मधील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसच्या फोटो देखील समोर आले आहेत..

सांगली जिल्हा कारागृहात गांजा ओढणाऱ्या बंदीवर शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

सांगलीतील वाढत्या नशेखोरी विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्स नियुक्त केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून पोलिसांचे छापा सत्र सुरू असताना नशेखोरी संबंधित आणखी एक कहर दिसून आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेटून बंदीकडे गांजा आणि चिलीम आढळली आहे. तिघा बंदी विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंदवला आहे. कारागृहात गांजा ओडणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे, संवेद सावळवाडे या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीला मिळाला 14 हजार 911 क्विंटलला दर

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीला सर्वाधिक दर मिळाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीची बाजार समितीमध्ये आवक वाढली 4365 पोत्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती.यावेळी 14 हजार 911 रुपये दर हळदीला मिळाला. यापूर्वी हळदीला सरासरी 11 हजार रुपये दर मिळाला होता.

Nagpur News: नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क

- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

- सामुहिक नमाज पठण करता येणाऱ्यांना तपासणी करूनच प्रवेश

- मेटल डिटेक्टरद्वारे पोलिसांकडून केली जातेय तपासणी

- याशिवाय प्रमुख दोन मार्ग वाहतूकीसाठी करण्यात आले बंद

- ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव करतात सामूहिक नमाज पठण

- ईदगाह मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

परभणीत ईदगाह मैदानावर उत्साहात ईदची नमाज संपन्न

आज परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्रची नमाज अदा केली. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर आज ईद साजरी होत असून, सकाळपासूनच ईदगाह मैदानावर नमाजसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज अदा केल्यानंतर नागरिकांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

मालेगावात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी, लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण..

मालेगाव ईदगाह मैदानात लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा...

मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली...

आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण केले..

मालेगावात 14 ठिकाणी नमाज पठण करण्यात आली तर 40 पेक्षा जास्त CCTV कॅमेरा वरून संपूर्ण लक्ष ठेवण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..

कोकण बोर्ड कॉपीमुक्तीतही अव्वल

कोकण बोर्ड कॉपीमुक्तीतही अव्वल राहिलं आहे.. दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात कॉपीचा एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित राहिली. कोकण बोर्डात दहावी परीक्षेत यंदा कॉपीचा एकही प्रकार आढळला नाही. तर बारावी परीक्षेत रत्नागिरीत कॉपीच्या फक्त एका प्रकाराची नोंद झाली आहे. राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवर आहे.

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी

कोल्हापूर -

प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी

प्रशांत कोरटकरला मदत केल्या प्रकरणी धीरज चौधरीला कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

प्रशांत कोरटकरला मोटार देणाऱ्या धीरज चौधरीची कोल्हापूर पोलिसांकडून कसून चौकशी

कोल्हापूर पोलिसांकडून तीन तासाहून अधिक वेळ चौधरी वर प्रश्नांची सरबत्ती

कोरटकरने वापरलेल्या दोन गाड्या पोलिसांनी केल्यात जप्त

Nagpur News: विदर्भात उन्हाचा तडाखा कायम, रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर पोहोचला

नागपूर -

- विदर्भात उन्हाचा तडाखा कायम, रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर पोहोचला

- विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर अकोल्याचा पारा 42 अंशाच्या

- गोंदिया, वाशिम 38 अंशावर तर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ येथील पारा 41 च्यावर पोहोचला आहे.

- नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस तापमान असेच चटके देणारे असण्याची शक्यता.

- 2 आणि 3 एप्रिल रोजी आकाश ढगांनी व्यापण्याची शक्यता..

- यादरम्यान विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Tulajapur Case: तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरण, पोलिसांकडून सक्त कारवाई सुरू

तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांकडून अत्यंत बारकाईने आणि सक्त कारवाई सुरू, जवळचा लांबचा न बघता कारवाई होतेय

ड्रग्ज चा प्रकार तुळजापूर पुरता मर्यादित नाही तर जिल्ह्यातील अनेक शहरात व ग्रामीण भागात व इतर तिर्थ क्षेञाच्या ठिकाणी देखील आहे

ड्रग्ज प्रकरणात कृपया कोणीही राजकारण करु नका-

ड्रग्ज प्रकरणात दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहभागी आहेत, राजकारणाच्या पलीकडे आपण जायला हव

तुळजापुर च नाव खराब करण्याच काम कृपया बंद करा,राजकारणासाठी एवढ्या खालच्या थराला जावु नका..

तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विरोधकांना आवाहन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.