दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनचा एक वेगळा चाहतवर्ग निर्माण झालाय. त्याची स्टाईल, त्याची भाषा याची चाहत्यांना भुरळ पडलीय. दरम्यान आता नाव बदलणार असल्याची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर सध्या अल्लू अर्जुन नाव बदलणार याच्या चर्चा जोर धरत आहेत. 'कोइमोई' आणि 'सिने जोश' यांच्या वृत्तानुसार अल्लू अर्जुन हा अंकशास्त्रावर विश्वास ठेवतो. त्यामुळे तो त्याच्या नावात दोन 'U' आणि दोन 'N' जोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच करिअर आणि यश अधिक वाढावं यासाठी अल्लूने नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. परंतु अल्लू अर्जुनने स्वत: याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
अल्लूच्या 'पुष्पा 2' ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याची एक वेगळी ओळख, वेगळी स्टाईल निर्माण झाली. दरम्यान अल्लूला त्याच्या आयुष्यात जास्त प्रगती करायची आहे. अंकशास्त्रानुसार नावामध्ये दोन अक्षर असणं शुभ असतं. त्यामुळे अल्लूने हा निर्णय घेतला असावा असं बोललं जातय. परंतु याबाबत अल्लू अर्जुनने स्वत: याबाबत कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
दरम्यान अल्लू अर्जुन सध्या त्याच्या अगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. त्याचा लवकरच 'AA22' नावाचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 एप्रिलला अल्लू अर्जुनचा वाढदिवस असतो. त्या दिवशी अल्लू नव्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.