Banner Controversy : कुणाल कामरा करणार पलावा पुलाचे उद्घाटन; मनसे नेते राजू पाटलांचा बॅनर चर्चेत
esakal April 01, 2025 07:45 PM

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील पलावा चौक हा वाहतूक कोंडीचे मुख्य जंक्शन आहे. येथील कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी व पलावा येथे नवीन पूल उभारण्यात येत आहे. अनेक वर्षापासून हे काम सुरू असून वारंवार पाठपुरावा करू ही अद्याप पुलाचे काम झाले नाही. यावरून मनसे नेते राजू पाटील यांनी सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन 31 एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे. असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?... की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटचा माध्यमातून पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक ,नागरिक विशेषकरुन शाळकरी विद्यार्थी त्रस्त आहेत. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. एकीकडे मेट्रोचे काम दुसरीकडे काही प्रमाणात रस्त्याचे काम आणि देसाई खाडी व पलावा पुलाचे देखील काम सुरू आहे. या कामांमुळे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते.

दीड दीड तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. नवी मुंबईकडे जाणाऱ््या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहतूक पोलीस वाहक वाहतूक नियंत्रण करण्याच्या प्रयत्न करतात. परंतु कधीकधी या रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी होते की, या रस्त्यावर प्रवास करू नये असा विचार येतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पलावा जंक्शन येथे दोन फुलांचे काम सुरू आहे.

हे काम काही वर्षापासून सुरू असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही पूल लवकर झाले तर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल या आशेने वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला जातो आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी पूलांच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतू पुलाचे काम अद्याप झालेले नाही. हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिकांच्या मनात आहे. आता तर मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावर पुलाचा बाजूला एक भला मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर आज म्हणजे एक एप्रिल रोजी लावण्यात आले आहे. एक एप्रिलला लोक एप्रिल फूल करुन अनेकांची खिल्ली उडवितात.

पलावा पुला संदर्भात राजू पाटील यांनी देखील प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी एक उपहासात्मक बॅनर लावला प्रशासान आणि सत्ताधारी पक्षांची एक प्रकारे खिल्ली उड्विली आहे. या बॅनर वर लिहिले गेले आहे. तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल? एवढेच नाही तर 31 एप्रिल रोजी या पुलाचे उद्घाटन देखील होणार आहे आणि चर्चेत असलेले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या हस्ते हा उद्घाटन होणार असल्याचे लिहिला गेला आहे. या बॅनर मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना एक्स देखील केले आहे. पुलाचे काम कधी होणार असं देखील विचारणा केली आहे. या बॅनरने कल्याण रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांच्या लक्ष वेधले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.