Stock Market Closing Today: शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज एक टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1357 अंकांनी घसरला आणि 76,060 वर बंद झाला. निफ्टी-50 देखील 353 अंकांनी घसरून 23,165 वर बंद झाला. बँक निफ्टीही 731 अंकांच्या घसरणीसह 50,832 वर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीची कारणे?- टॅरिफबद्दल चिंता
ट्रम्प यांच्या संभाव्य टॅरिफ योजनेच्या प्रभावाबाबत जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजार सावध व्यवहार करत आहेत. रुचित जैन, टेक्निकल रिसर्च हेड, मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, "सोमवारी जेव्हा भारतीय बाजार बंद होते, तेव्हा जागतिक बाजारात घसरण दिसून आली. आज देशांतर्गत बाजारातही त्याचाच परिणाम दिसून आला." त्यांनी सांगितले की निफ्टीला 23,100 च्या आसपास सपोर्ट मिळू शकतो.
- प्रॉफिट बुकिंग
मार्चच्या सुरुवातीपासून बाजारात पुनर्प्राप्तीनंतर, गुंतवणूकदार आता प्रॉफिट बुक करत आहेत. इक्वोनॉमिक्स रिसर्चच्या जी चोक्कलिंगम यांच्या मते, मार्चमध्ये सुमारे ₹25 लाख कोटींची मार्केट कॅप रिकव्हरी झाली. अशा स्थितीत प्रॉफिट बुकींग होणे स्वाभाविक आहे. पाच महिन्यांच्या घसरणीनंतर बेंचमार्क निर्देशांक मार्चमध्ये 6% पेक्षा जास्त वाढला होता, कारण परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती.
-एफआयआय विक्री
गेल्या दोन आठवड्यांत, FII (परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) निव्वळ खरेदीदार राहिले, ज्यामुळे बाजारात सुधारणा दिसून आली. परंतु शुक्रवारी ₹4,352 कोटींची निव्वळ विक्री केली. चोक्कलिंगम म्हणाले की, आजही एफआयआय विक्री करत आहेत. तसेच मोठ्या शेअर्सवर दबाव आहे.
- ग्लोबल संकेत
वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये घसरण दिसून आली. जपानचा निक्केई 0.01% खाली होता तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.5% वर होता. ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊस रोज गार्डनमध्ये 2 एप्रिलपासून लागू होणाऱ्या दरांची घोषणा करणे अपेक्षित आहे. हे पाहता बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरता आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंटचे व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, हे दर कोणत्या क्षेत्रांवर आणि देशांवर किती परिणाम करतात यावर बाजाराची दिशा अवलंबून असेल.