आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2205) बुधवारी 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने या हंगा्मात अप्रतिम सुरुवात केली आहे. आरसीबीने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना पराभूत केलंय. विशेष म्हणजे आरसीबीने हे दोन्ही सामने प्रतिस्पर्धी संघांच्या घरच्या मैदानात विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबीचा विश्वास दुणावलेला आहे.
तर दुसऱ्या बाजूला गुजरातची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. पंजाब किंग्सने गुजरातवर मात केली. मात्र गुजरातने दुसर्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात दोन्ही संघांचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्ना कोण यशस्वी ठरणार? हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.
आकडेवारीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरात टायटन्सवर वरचढ आहे. दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. आरसीबीने या 5 पैकी सर्वाधिक 3 सामने जिंकले आहेत. तर गुजरातनेही 2 सामन्यात पलटवार केला आहे. त्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबल आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना बुधवारी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
दरम्यान गेल्या हंगामात दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले होते. आरसीबीने दोन्ही वेळा गुजरातचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे गुजरात या पराभवाचा वचपा घेण्यासह आरसीबीची विजयी घोडदौड रोखण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.