आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. गुजरातने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात गुजरातचा पराभव झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीकडे या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर गुजरात टायटन्ससमोर आरसीबीची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना बुधवारी 2 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.
गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.