पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. लखनौकडून पंजाबला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं. पंजाबने हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. पंजाबचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. तर लखनौचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा पराभव ठरला. लखनौच्या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने फलंदाजांवर खापर फोडलं. पंतने सामन्यानंतर काय म्हटलं? जाणून घेऊयात.
“आम्ही 20-25 धावा कमी केल्या, मात्र हा खेळाचा भाग आहे. आम्ही आताही घरच्या मैदानातील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला विकेट्स गमावल्यास मोठी धावसंख्या करणं अवघड होतं. मात्र सर्व खेळाडू मेहनत करत आहेत. स्लो विकेटचा फायदा घ्यायचा, असं आमचं ठरलं होतं. संथपणे बॉल टाकणं प्रभावी ठरलं. आम्ही कुठे चुकलो? हे या सामन्यातून शिकून पुढे जाऊ. टीमने चांगली कामगिरी केली. जास्त काही बोलण्याची गरज नाही”, असं ऋषभने म्हटलं.
दरम्यान लखनौला 8 विकेट्सच्या फरकाने सामना गमावणं चांगलंच महागात पडलंय. लखनौला पराभवासह दुहेरी झटका लागला आहे. लखनौला पॉइंट्स टेबलमध्ये फटका बसला आहे. लखनौची पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांचा तोटा सहन करावा लागलाय. लखनौ या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी होती. मात्र पंजाबने मोठ्या फरकाने पराभूत केल्याने लखनौ थेट सहाव्या स्थानी फेकली गेली आहे. तर पंजाबने पाचव्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.