संपूर्ण भारत देशात रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि परवडणारा मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रवासाला प्रवाशांची नेहमीच पसंती असते. दररोज रेल्वे प्रवाशांची वाढतीच आहे.
प्रत्येक क्षेत्रात महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढताहेत,असं कुठलंही क्षेत्र नाही,जे महिलांनी व्यापलेलं नाही. तसंच भारतीय रेल्वे सेवेतही महिलांचं प्रमाण उल्लेखनीय आहे.
भारतीय रेल्वेत लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. पण रेल्वेनं आता आपल्या सेवेत महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढवलं आहे.
भारतीय रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या मागच्या 10 वर्षांत सातत्याने वाढतेच आहे. सध्या ही संख्या 1.13 लाखांहून अधिक असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
रेल्वेत लोको पायलट म्हणून सध्या 2162 महिला कार्यरत आहेत. तसेच 794 महिला ट्रेन मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संपूर्ण भारतात 1699 महिला स्टेशन मास्तर म्हणून सध्या ड्युटीवर आहेत.
4 हजार 446 महिला तिकीट तपासनीस आणि 4 हजार 430 महिला रेल्वे स्थानकांवर ‘पॉइंट्समन’ पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
भारतीय रेल्वेत 12,362 महिला कार्यालयीन कर्मचारी आणि 2,360 महिला पर्यवेक्षक म्हणून पदावर नियुक्त आहेत.
या घडीला रेल्वेत 7 हजार 756 महिला ट्रेनच्या सुरक्षित संचालनासाठी योगदान देत आहेत.
भारतीय रेल्वेनं त्यांच्या विविध विभागात महिलांंना जास्तीत जास्त सेवेत काम करण्याची संंधी देतानाच स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं मोठं आणि तितकंच महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.