Maharashtra Politics live : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर
Sarkarnama April 03, 2025 11:45 AM
Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या आजच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. प्रकृती ठीक नसल्यानं ते या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नसल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय देशमुख घेणार अजित पवारांची भेट

मस्साजोगचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी (ता.01) कळंब पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनिषा बिडवे हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी मागणी त्यांनी केली. तर आज ते बीडच्या दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुखांचे कळंबमधील कोणत्या महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचा दिखावा करणार होते? त्या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा ही मागणी धनंजय देशमुख अजित पवारांकडे करणार आहेत

Waqf Board Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. हे विधेयक पास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावला आहे. तर विरोधक देखील या विधेयकाला जोरदार विरोध करण्याच्या तयारीत आहेत. या विधेयकावर आज सभागृहात जवळपास आठ तास चर्चा होणार आहे. त्यामुळे हे विधेयक लागू होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.