डोनाल्ड ट्रम्प दर भारत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा बुधवारी (2 मार्च) रात्री उशिरा केली. भारतावर 26 टक्के आयात शुल्क (Trump announces 26% tariffs on India) लादण्यात येणार आहे. चीनवर 34 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसू शकतो. कृषी, मौल्यवान खडे, रसायने, औषधनिर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांना या निर्णयाचा फटका बसेल.तर भारताचं वाणिज्य खातं याचा काय परिणाम होईल हे तपासत आहे. मात्र हा फार मोठा फटका नाही असं वाणिज्य विभागाचं मत असल्याची माहिती आहे.
अमेरिकेने आयात शुल्क लादण्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवर झाला आहे. अमेरिकी आणि आशियाई शेअर बाजारात मोठी पडझड झालीय. डाऊ जोन्स 2.4 टक्के, नॅसडॅक 4.2 टक्के कोसळला. तर ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी 500 फ्यूचर्समध्ये 3.5 टक्क्यांची पडझड झाली. टोक्योचा निक्केई 225 इंडेक्स 3.4 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स 1.9 टक्के कोसळला. आता भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय परिणाम होतो याची उत्सुकता आहे.
डोनाल्ड ट्रम्पच्या आयात शुल्क धोरणामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी उघडलेल्या आशियाई बाजारांवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. गिफ्ट निफ्टी 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे आणि 23, 200च्या खाली घसरला आहे. जपानचा बाजार निक्केई 4% पेक्षा जास्त घसरला आहे, तर कोरियाचा बाजार कोस्पी 3% पेक्षा जास्त घसरणीसह व्यवहार करत आहे. चीनचा बाजार शांघाय कंपोझिट देखील घसरणीसह उघडला आहे, हाँगकाँगचा बाजार हँग सेंग 2% पेक्षा जास्त घसरला आहे.
१. चीन: ३४ टक्के
२. युरोपियन युनियन: २० टक्के
३. दक्षिण कोरिया: २५ टक्के
४. भारत: २६ टक्के
५. व्हिएतनाम: ४६ टक्के
६. तैवान: ३२ टक्के
७. जपान: २४ टक्के
८. थायलंड: ३६ टक्के
९. स्वित्झर्लंड: ३१ टक्के
१०. इंडोनेशिया: ३२ टक्के
११. मलेशिया: २४ टक्के
१२. कंबोडिया: ४९ टक्के
१३. युनायटेड किंग्डम: १० टक्के
१४. दक्षिण आफ्रिका: ३० टक्के
१५. ब्राझील: १० टक्के
१६. बांगलादेश: ३७ टक्के
१७. सिंगापूर: १० टक्के
१८. इस्रायल: १७ टक्के
१९. फिलीपिन्स: १७ टक्के
२०. चिली: १० टक्के
२१. ऑस्ट्रेलिया: १० टक्के
२२. पाकिस्तान: २९ टक्के
२३. तुर्की: १० टक्के
२४. श्रीलंका: ४४ टक्के
२५. कोलंबिया: १० टक्के एआरडी
भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात. दरम्यान, भारत आणि इतर प्रभावित देश प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करू शकतात आणि अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते. तथापि, ट्रम्पचा दावा आहे की या आयात शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले जाईल.
https://www.youtube.com/watch?v=_p-ll0zdsp4
अधिक पाहा..