55269
शिवसेनेत नेहमीच योग्य सन्मान
संजू परब ः शिरशिंगे, राणेवाडीतील ग्रामस्थ शिंदे गटात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः शिरशिंगेतील ठाकरे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव राऊळ आणि पंढरी राणे यांच्यासह राणेवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. परब यांनी या सर्वांचे स्वागत करीत त्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी ग्रामस्थांनी माजी मंत्री व आमदार दिपक केसरकर आणि युवा नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रयत्नातून त्यांच्या गावातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यापुढेही गावाचा विकास साधण्यासाठी ते शिंदे शिवसेनेसोबत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या विविध समस्या परब यांच्यासमोर मांडल्या, ज्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. परब यांनी दिले.
या सोहळ्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नंदू शिरोडकर, महिला संघटक श्रीमती सेजल लाड, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, श्रीमती उज्वला नाईक, श्रीमती उज्वला राऊत, सुभेदार सुरेश घावरे, मनोहर घावरे, प्रभाकर घावरे, नारायण घावरे, गंगाराम राऊळ, प्रकाश जाधव, महादेव जाधव आदी उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुवर्णलता राणे, स्वरा राणे, संचिता राणे, आदित्य राणे, शैलेश राणे, रघुनाथ राणे, मनोज धोंड, सावित्री धोंड, दशरथ राऊळ, दर्शना राऊळ, लक्ष्मी राऊळ, राजेश राऊळ, उदय नाईक, उज्वला नाईक, कृष्णा नाईक, रुक्मिणी नाईक, कृष्णा घाडी, राजश्री घाडी, साबाजी राऊळ, रामदास घाडी, गोविंद घाडी, स्वप्निल सावंत, साहिल सावंत, सोमा मेस्त्री, गणपत मेस्त्री, दीपक मेस्त्री, समीर आमुणेकर, वंदना आमुणेकर, राधाबाई मोहिते, सायली मोहिते, सुरेश मोहिते, शैलेंद्र मोहिते, राजेश राऊळ, साहिल गवस, विशाल गवस, रोशन गवस, विनोद राणे, महादेव राणे आदींचा समावेश आहे.
---
सत्तेच्या पाठिंब्याशिवाय विकास अशक्य
श्री. परब यांनी सत्तेच्या पाठिंब्याशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे विकासासाठी सर्वांनी आमदार केसरकर यांना साथ देणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या पायवाट प्रश्नावर बोलताना, येत्या मेपर्यंत हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल. राजकारणासोबत सामाजिक कार्यही महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या समस्यांसाठी मदतीची गरज असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. शिवसेना प्रवेश करताना विकासकामे मार्गी लावण्याचा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता, असेही ते म्हणाले. प्रवेशकर्त्यांनी आमदार केसरकर आणि त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवला जाईल, असे सांगितले.