Salman Khan Sikandar : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सिकंदर' बद्दल चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर, इंडस्ट्रीतील कोणीही 'सिकंदर' या चित्रपटाला किंवा सलमान खानला पाठिंबा दिला नाही त्यामुळे सलमानने एका मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की, 'जेव्हा इतरांचे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा मी त्यांना पाठिंबा देतो. पण माझ्या चित्रपटाच्या घोषणेनंतर इंडस्ट्रीतील अनेक जण शांत होतात, पण, मलाही त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.'
सलमान खानने असेही सांगितले की, 'सिकंदर' हा माझ्यासाठी एक खास प्रोजेक्ट आहे. मी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या चाहत्यांनी नेहमीच मला प्रेम आणि पाठिंबा दिले आहे, पण इंडस्ट्रीतील माझ्या काही सह कलाकारांकडून मला थोडा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षित आहे.'
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि निर्मात्यांनी सलमान खानच्या सिकंदर' बद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सलमानच्या खास मित्र मैत्रीणींनी देखील या चित्रपटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सलमान थोडा नाराज झाला आहे. मात्र, सलमानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सलमानला भरभरून पाठिंबा आणि प्रेम दिले आहे. सलमान खानला आम्ही आहोत तू तुझ्यासाठी अशा कमेंट करून सपोर्ट करण्याचा चाहते प्रयत्न करत आहेत. सलमानच्या एका चाहत्याने तर, ८० लाख रुपयांची तिकिटे खरेदी करुन मोफत वाटली होती.
ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानचा अॅक्शन अवतार चाहत्यांना आवडला आहे. या चित्रपटात सह रश्मिका मंदान्ना, प्रतीक पाटील, काजल अग्रवाल आणि सत्यराज यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित 'सिकंदर' या चित्रपटाने चार दिवसात 84.25 कोटी रूपये कमावले आहे.