Sikandar box office collection day 5: सलमान खानच्या 'सिकंदर'ची घसरण, १,१०० शो रद्द, पाच दिवसात फक्त 'इतके' कोटीच कमावले
Saam TV April 04, 2025 08:45 PM

Sikandar box office collection: सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सिकंदर' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे. गुरुवारी चित्रपटाने केवळ ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली, त्यामुळे त्याची एकूण देशांतर्गत कमाई ९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर, जागतिक स्तरावर, चित्रपटाची कमाई १४०.२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच्या पाचव्या दिवशी, 'सिकंदर'साठी फक्त ८.२४% प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली. एकूण उपस्थितीपैकी, सकाळच्या शोमध्ये ४.७४% प्रेक्षकांची उपस्थिती होती, दुपारच्या शोमध्ये ८.१७%, संध्याकाळच्या शोमध्ये ९.३५%, आणि रात्रीच्या शोमध्ये १०.६८% प्रेक्षकांची उपस्थिती दिसून आली. ही आकडेवारी चित्रपटाच्या घटत्या लोकप्रियतेचे संकेत देते.

'सिकंदर'च्या वाईट प्रदर्शनामुळे, अनेक थिएटरांनी या चित्रपटाचे शो कमी केले आहेत. प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांत, या चित्रपटाचे १,१०० शो रद्द करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

च्या चाहत्यांनी चित्रपटाविषयी नकारात्मक समीक्षणांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ''विरोधात पेड निगेटिव्ह रिव्ह्यूज दिले जात आहेत, त्यामुळे चित्रपटाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांनी असेही नमूद केले की, काही थिएटरमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत, परंतु सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.