आपल्या भारतात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे आपल्या देशातील मुख्य धान्यांपैकी एक म्हणून तांदळाची ओळख आहे. तुम्ही जेव्हा भारताच्या इतर राज्यांमध्ये गेलात तर प्रत्येक ठिकाणी तादंळाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. तसेच भारतीय थाळी असो जेवण भाताशिवाय जेवण पुर्ण होतच नाही. मात्र आपण जर पाहिले तर आपल्या देशात 90 ते 95 टक्के पांढरा तांदूळ जास्त प्रमाणात वापरला जातो किंवा खाल्ला जातो. मात्र तांदुळामध्ये अनेक प्रकार आहेत. ज्यात लाल तांदूळ हा आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे.
लाल तांदळामध्ये फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या तांदळाचा आहारात समावेश केल्याने हदयरोगापासून ते रक्तातील साखरेपर्यंत अनेक आजारांपासुन सुटका होते. तसेच शरीराला प्रचंड उर्जा सुद्धा मिळते.
लाल तांदळामध्ये इतर तांदळाच्या जातींपेक्षा खूप जास्त प्रथिने असतात. या लाल तांदळामध्ये दाट पोषक तत्व असल्याबरोबर भरपूर फायबर देखील समावेश आहे. तसेच लाल तांदळामध्ये अँथोसायनिन, एपिजेनिन, मायरिसेटिन, क्वेर्सेटिन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे अनेक रोगापासुन दुर ठेवते. हे सर्व घटक पेशींमधून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
आपल्यापैकी अनेकांना शरीरात जळजळ होण्याची समस्या सतावत असते. या जळजळीमुळे पेशी सुजतात, ज्यामुळे कर्करोग, संधिवात, सांधेदुखी, मधुमेह आणि हृदयरोग यासह अनेक आजार होण्याची शक्यता असते. अशावेळेस तुम्ही जर लाल भात खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात आणि शरीरातील जळजळ देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे मधुमेह, बीपी, संधिवात यांसारख्या आजारांचा धोका देखील कमी होईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नियमितपणे लाल तांदूळ खाल्ले तर तुम्ही या प्राणघातक आजारांच्या धोक्यापासून दूर राहाल. लाल तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यात भरपूर स्टार्च देखील असतो. त्यामुळे पोट आतून स्वच्छ करण्यासाठी ते फायदेशीर आहे. जर तुम्ही लाल भात खाल्ला तर तुमची हाडे मजबूत होतील. लाल तांदळामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते जे श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांसाठीही लाल तांदूळ खूप फायदेशीर आहे.
लाल भात खाल्ल्याने त्वचेला चमक येऊ शकते. कारण लाल तांदळामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट अँथोसायनिन त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते. हे त्वचेला अकाली वृद्धत्व होण्यापासून रोखते. अशाप्रकारे, लाल भात खाल्ल्याने सौंदर्य वाढवता येते.
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी लाल भात खूपच फायदेशीर आहे. लाल भात हा पोटासाठी रामबाण उपाय आहे. हे पचनशक्ती वाढवून चयापचय वाढवते. यामुळे ऊर्जेचा वापर वाढतो आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. अशा परिस्थितीत, लाल भात खाल्ल्यानंतर भूकेची भावना कमी होते आणि त्यामुळे वजन नियंत्रित होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)