आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये ऑलराउंडर शार्दुल ठाकुर (Shardul Tahkur) अनसोल्ड राहिला. मात्र लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) अनसोल्डचा टॅग लागलेल्या शार्दुलला आपल्या गोटात घेतलं. शार्दुलने टीम मॅनेमेंटचा हा निर्णय योग्य ठरवला आहे. शार्दुलने 4 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) रंगतदार झालेल्या सामन्यात निर्णायक क्षणी चिवट बॉलिंग केली आणि लखनौच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. लखनौच्या विजयानंतर सोशल मीडियावर शार्दूलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
लखनौने मुंबईला 204 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवने सहकाऱ्यांच्या मदतीने अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. मात्र सूर्या 17 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 67 धावांची खेळी करुन आऊट झाला. मुंबईने अशाप्रकारे 152 धावांवर चौथी विकेट गमावली. सूर्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक मैदानात आला. तसेच सूर्यासह तिलक वर्मा हा होता. दोघेही स्फोटक फलंदाज मैदानात असल्याने सामना मुंबईला विजयाची आशा होती. मुंबईने 18 ओव्हरपर्यंत 175 धावा केल्या. त्यामुळे आता विजयासाठी 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज होती.
शार्दूल मुंबईच्या डावातील 19 वी आणि निर्णायक ओव्हर टाकायला आला. शार्दूलने हार्दिक आणि तिलकला एकही फटका मारायची संधी दिली नाही. शार्दुलने अगदी चिवटपणे बॉलिंग करत हार्दिक आणि तिलकसमोर फक्त 7 धावा दिल्या. शार्दुलने पहिल्या 5 बॉलमध्ये प्रत्येकी 1-1 धाव दिली. तर सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर 2 धाव दिल्या. शार्दुलने केलेल्या चिवट बॉलिंगमुळे मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची गरज होती. शार्दुलमुळे आवेश खानला शेवटच्या ओव्हरमध्ये बचावासाठी 22 धावा मिळाल्या. आवेशनेही हुशारीने बॉलिंग करत फक्त 9 धावा दिल्या. लखनौने अशापक्रारे मुंबईवर 12 धावांनी मात केली आणि हंगामातील दुसरा विजय साकारला.
शार्दुलची चिवट गोलंदाजी
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.