तळेगाव स्टेशन, ता. ४ : वराळे आंबी रस्त्यावरील एका चाळीच्या आडोशाला एक व्यक्ती अवैधरीत्या देशी दारू विक्री करत असताना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून सुमारे पाच हजार रुपये किमतीचे मद्य जप्त केले. परमेश्वर बुधा जाधव (वय ५४, वराळे ता. मावळ जि. पुणे, मुळगाव- खोदड, तांडा, ता. जि. धुळे) हा बेकायदा, बिगर परवाना देशी दारू विक्री करत असताना त्याच्याजवळील एकूण ८९ बाटल्या किंमत ४ हजार ७९५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अंमलदार रमेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---