Maharashtra Politics live : राज ठाकरे हे राजकीय स्टँडअप काॅमेंटेटर - अॅड. गुणरत्न सदावर्ते
Sarkarnama April 06, 2025 03:45 PM
राज ठाकरे हे राजकीय स्टँडअप काॅमेंटेटर - अॅड. गुणरत्न सदावर्ते

राज ठाकरेंनी मुंबईत किती टक्के मराठी आहेत याचा आधी अभ्यास करावा. त्यांच्या सारख्या पार्ट्या या गलोगल्ली असतात. राज ठाकरे हे राजकीय स्टँडअप काॅमेंटेटर आहेत, असा टोला अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.

वक्फ विधेयक कचरा कुंडीत फेकून देऊ - तेजस्वी यादव

वफ्त सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. काँग्रेस या विधेयकाच्या विरोधात न्याालयात जाणार आहे. तर, बिहारमध्ये आमची सत्ता आली तर हे विधेयक आम्ही कचराकुंडीत फेकून देऊ, असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणतीही कारवाई होणार नाही - संजय राऊत

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला संघाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे रुग्णालयावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा दाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Ambernath BJP : भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं

अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत झाली कैद झाली आहे.

Shivendra Raje Bhosale : कामांचा पाऊस पाडणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पंढरपुरात एका कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांना अनेक रस्त्यांच्या अडचणीं लोकप्रतिनिधींनी सांगितल्या. यावर बोलताना त्यांनी यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितल्यामुळे काही करू शकलो नाही. पण, जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो, असे आश्वासन स्थानिक आमदार समाधान अवताडे आणि अभिजीत पाटील यांना दिलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Bharat Gogawale : चांगले काम करणाऱ्याची साथ द्या - भरत गोगावले

ज्यांनी कधीच आपली कोणती कामे केली नाहीत, त्यांना सुद्धा तुमची मते जाऊ शकतात असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. सगळ्यांनी हातात हात धरुन काम करु आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देऊ. चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नका असं आवाहन देखील गोगावले यांनी केलं आहे.

Ajit Pawar : शेतकऱ्यांबाबत आम्हाला आत्मीयता - अजित पवार

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? असा प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला होता. यावरुन त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. या सर्व प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मंत्री कोकाटे नेमकं काय बोलले ते मला माहिती नाही. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असं जर काही बोलले असतील तर त्यांच्याकडून माहिती घेऊन मी बोलेल. शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे. आज सगळ्यांना आपल्याला तो जगवतो, शेतकऱ्यांबाबत आम्हाला आत्मीयता आहे."

Latur Crime : लातूर महापालिका आयुक्तांचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने ते या गोळीबारातून बचावले आहेत. त्यांच्यावर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे हादरुन गेले आहे.

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली मंजुरी

अखेर वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 आता कायद्याक रूपांतरित झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंजरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीपूर्वी वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेने प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.