Celebrity Masterchef Gaurav Khanna: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा शेवट अगदी जवळ आला आहे आणि टॉप ५ स्पर्धक त्यांचे सर्वोत्तम सादरीकरण देण्यासाठी सज्ज आहेत. तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, राजीव अदातिया आणि फैजल शेख हे शो जिंकण्यासाठी रिंगणात आहेत आणि त्यांच्यात कठीण स्पर्धा सुरूच आहे. नवीन भागात, सर्वांच्या नजरा गौरव खन्नावर होत्या कारण त्यांने तयार केलेल्या डीशने परीक्षक रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांना थक्क केले.
'' या शोच्या अंतिम फेरीत अभिनेता गौरव खन्नाने जज रणवीर बरार आणि विकास खन्ना यांच्यासमोर मध असलेली एक विशेष डिश सादर केली. या डिशच्या सादरीकरणाने जज प्रभावित झाले आणि त्यांनी गौरवच्या कौशल्याचे कौतुक केले.
पण, सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी गौरव खन्ना यांनी स्विस शेफ डाइव्स जोश यांच्या डिशची नक्कल केल्याचा आरोप केला आहे. डाइव्स जोश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा प्रोमो शेअर करताना, 'खूप छान, खूप क्रिएटिव्ह...' असा व्यंगात्मक संदेश दिला. यानंतर, त्यांनी त्यांच्या मूळ डिशचे चित्र शेअर करून 'द ओरिजिनल' असे लिहिले.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, काही वापरकर्ते वर टीका करत आहेत, तर काही त्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. शोच्या निर्मात्यांनी किंवा गौरव खन्ना यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.