मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांची भिसे कुटुंबांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणी भिसे कुटुंबाना न्याय देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
Karuna sharma: धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा केला दावाकरुणा शर्मा यांनी माझगाव कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे सादर केले असल्याचे सांगितले. आम्ही लवकरच याबद्दलची रेकॉर्डिंग लवकरच सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Uday Samant : ठाकरेंचे अनेक शिलेदार आमच्या संपर्कातमंत्री उदय सामंत यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरेंचे अनेक शिलेदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.
Sanjay Raut : कुणाल कामरा सोबत माझं बोलणं झालंशिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं कुणाल कामरांसोबत माझं बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी नुकतीच पत्रकारपरिषद घेऊन तशी माहिती दिली आहे. पत्रकारांनी त्यांना कामरा यांच्यावर प्रश्न केला असता त्यांनी कुणाल कामरांना आपण एक सल्ला दिला असल्याचेही सांगितले.
Rama Navami : संभाजीनगरात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्तदोन वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दंगल झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून उद्या. दि.६ रामनवमी असल्याने छत्रपती संभाजी नगरात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर असणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची शरद पवारांनी घेतली माहितीपुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची माहिती शरद पवारांनी घेतली. १० लाख भरले नाहीत म्हणून अॅडमीट करून घेतलं नाही मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या संदर्भात शरद पवार प्रशासनाशी बोलण्याची शक्यता आहे.
दीनानाथ रुग्णालय आत्ता रुग्णांकडून अनामत रक्कम घेणार नाही, विश्वस्तांच्या बैठकीत निर्णयगर्भवती महिलेने १० लाख अनामत रक्कम दिली नसल्याने तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून घेतले नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्तांनी अनामत रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही.
ठाकरेंची वक्फ बोर्डाबाबत व्होट बँकेसाठी वेगळी भूमिका - चंद्रशेखर बावनकुळेवक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदान केले. ठाकरेंची ही भूमिका मुंबई महापालिका निवडणुकीत व्होट बँक तयार करण्यासाठी घेतली आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Uday Samant met Raj Thackeray : उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेटमहायुतीचे मंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठीच्या मुद्यावरून राज यांची भेट घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. शिवाय मराठी भाषिकावर काही ठिकाणी अन्याय होत आहे. याबाबत राज ठाकरेंशी चर्चा झाली. इतर भाषेचा सन्मान आम्ही करतो तसाच मराठीचा देखील व्हावा अशी राज ठाकरेंची भूमिका असून आमचीही तीच भूमिका आहे, असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
Hingoli tractor accident : चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाहिंगोली जिल्ह्यात शेतमजूरांना शेतात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट विहिरीत पडला. या अपघातात 7 महिला शेतमजुरांना मृत्यू झाला आहे. वसमत तालुक्यातील गुंजगाव येथील आलेगाव शिवारातील शेतात येत असताना हा अपघात घडला. या प्रकरणी आता लिंबागाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकासह शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Kashmir Marathi Book village : महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये साकारणार मराठी पुस्तकांचे गावमराठी भाषेतील वाचन संस्कृती समृद्ध व्हावी यासाठी परराज्यात पुस्तकांचे गाव योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या योजेनेची सुरुवात काश्मीरमधून होणार आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव निर्माण करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या योजनेद्वारे परराज्यात देखील पुस्तकांचे गाव योजना ही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
Tanisha Bhise Death Case : डॉ. घैसास यांचं नर्सिंग होम फोडणाऱ्या भाजपच्या महिला आंदोलकांवर गुन्हा दाखलपुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशाची मागणी करत वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील भाजप महिला आघाडीच्या महिलांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली होती. तर आता या तोडफोड प्रकरणी आंदोलक महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी वस्तूची तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.