आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी होताना दिसत नाही. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. असं असातना चेन्नई सुपर किंग्सची वाट बिकट होत जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 6 गडी गमवून 183 धावा केल्या. तसेच विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान चेन्नई सुपर किंग्ससाठी खूपच अवघड गेलं. आघाडीचे फलंदाज या धावांचा पाठलाग करताना झटपट बाद झाले. रचिन रविंद्र, डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा स्वस्तात बाद झाले. विजय शंकर त्यातल्या त्यात 54 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने 26 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या.
कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘गेल्या काही सामन्यांपासून ते आपल्या मनासारखे चालत नाहीये. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत पण आमच्या मनासारखे चालत नाहीये. निश्चितच खूप विकेट्स गमावल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी विभागातही ही एक मोठी चिंता आहे. आम्ही 15-20 धावा जास्त देत आहोत किंवा खूप विकेट्स गमावत आहोत. आम्ही प्रयत्न करत आहोत पण ते घडत नाहीये. मला वाटते की पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही थोडे जास्त चिंतेत आहोत किंवा संशयास्पद आहोत.’
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.