रणजीत माजगावकर, साम टीव्ही
कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांविरुद्ध आक्रमक झाला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांविरोधात टोकाची टीका करु लागले आहेत. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जात आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्या दाढीवर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मला हलक्यात घेऊ नका, माझ्या दाढीवर बोलू नका, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात विरोधकांवरटीका केली. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे
तुम्ही आम्हाला जे भर भरून मत दिले, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे. महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की, तुम्ही विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा सोडली नाही.
नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात, तेवढे देखील मिळाले नाहीत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलाय हा इतिहास घडवला आहात. महाराष्ट्रातील जनतेने इतिहास घडवल्याने तुमच्या ऋणातून उतरू शकत नाही.
आपल्याला या राज्याचा विकास करायचा खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे पाहिजे.
शेतकरी सन्मान योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना ५० टक्के एसटी सवलत, लेक लाडकी, लखपती योजना सुरू केली. कोणाकोणाच्या खातात पैसे नव्हते, त्यांनाही सुरू केलं. निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एकच मारा, पण सॉलिड मारा.