इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सविरुद्ध ५० धावांनी विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्सने हा विजय संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली जिंकला.
हा राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसनच्या नेतृत्वात मिळवलेला ३२ वा विजय ठरला. त्याने ६२ सामन्यांत राजस्थानचे नेतृत्व केले आहे, त्यात ३२ विजय मिळवले.
त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने शेन वॉर्नचा विक्रम मागे टाकला.
शेन वॉर्नने ५५ सामन्यांत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना ३१ विजय मिळवले आहेत.
सॅमसन आणि वॉर्नच्या पाठोपाठ राहुल द्रविड आहे. द्रविडने ३४ सामन्यातील १८ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून विजय मिळवले आहेत.
स्टीव्हन स्मिथने २७ सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना १५ विजय मिळवले आहेत.
अजिंक्य रहाणेने २४ सामन्यांपैकी ९ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून विजय मिळवले आहेत.