मुंबई : शेतकऱ्यांचा अपमान करण्याची एकही संधी भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकार सोडत नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीचे काय करता? लग्न, साखरपुडे करता; शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.
त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
ते म्हणाले, की कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करीत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटे यांच्या घरचा नाही.