करमाळा हादरलं! तणाव असह्य झाला, वडिलांनी चिमुकलीसमोरच आईला संपवलं अन् स्वत:च्या गळ्यालाही दोर ल
Marathi April 06, 2025 03:24 PM

करमाळा: करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवराज लक्ष्मण शेरे (वय 31) व रूपाली युवराज शेरे (वय 25) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून युवराज सतत पत्नीला चिडचिड करत होता, कुटुंबियांना देखील तो मागील दोन महिन्यापासून व्यवस्थित बोलत नव्हता. त्याला कोणता तरी मोठा ताण होता, ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतःलाही संपविले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. (Solapur Crime News)

युवराज शेरे हा पत्नी ,आई, वडील,भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होता.  युवराज शेरे व त्यांची पत्नी रूपाली दोघेच घरी होते. घरात कोणीही नसल्याने युवराजने पत्नी (Solapur Crime News) रूपालीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या हातून होत्याचे नव्हते झाल्याच्या पश्चातापातून युवराजने देखील स्वतः घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (Solapur Crime News)

त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेलेली कुटुंबातील इतर लोक घरी आली. त्यावेळी चिमुकली बंद घरात रडत होती. त्यावेळी युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला. तेव्हा सून रूपाली निपचित पडली होती आणि युवराज लोखंडी अँगलला लटकत असल्याचे दिसले. त्यांनी युवराजला खाली उतरवले आणि पोलिसांना कळविले. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले आहेत. पोलिस निरीक्षक विनोद घुगे याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.