गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण आणि सलग तिसरा विजय मिळवला आहे. गुजरातने सनरायजर्स हैदराबादचा घरच्या मैदानात 7 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी हॅटट्रिक साजरी केली आहे. हैदराबादने गुजरातला 153 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान शुबमन गिल याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 16.4 ओव्हरमध्ये या धावा केल्या. शुबमन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
शुबमन गिल याने 43 बॉलमध्ये 9 फोरसह 61 रन्स केल्या आणि गुजरातला विजयी करुन नाबाद परतला. शेरफेन रुदरफोर्ड यानेही स्फोटक खेळी केली. शेरफेनने 16 चेंडूत 218.75 च्या तोडू स्ट्राईक रेटने 6 चौकार आणि 1 षटकारासह 35 धावांची खेळी केली. त्याआधी वॉशिंग्टन सुंदर याने गुजरातकडून पदार्पणात अविस्मरणीय खेळी केली. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. सुंदरने 29 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 49 धावा केल्या. तर हैदराबादकडून मोहम्मद शमी याने 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून हैदराबादला 152 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. गुजरातच्या बॉलिंगसमोर राक्षसी बॅटिंग करणारे हैदराबादचे फलंदाज ढेर झाले. यात मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच इतरांनीही सिराजला चांगली साथ दिली. त्यामुळे हैदराबादला 8 विकेट्स गमावून 152 धावांपर्यंतच पोहतचा आलं.
दरम्यान हैदराबादचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला. हैदराबादने या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजयी सलामी दिली. मात्र त्यानतंर हैदराबादला लखनौ, दिल्ली, कोलकाता आणि आता गुजरातने पराभूत केलं आहे.
गुजरातची विजयी हॅटट्रिक
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडीस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.