CNG Price Hike मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध देशांवर टॅरिफ लादण्यात आलं आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लादण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी 9 एप्रिलपासून होणार आहे. याच दरम्यान शेअर मार्केट कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. सोमवारी (7 एप्रिलला) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं त्याचे दर महागले होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुंबईत पीएनजी आणि सीएनजीचे दर देखील वाढणार आहेत. महागनगर गॅस लिमिटेडनं दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानं महागनगर गॅस लिमिटेडकडून पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर 1 रुपयानं तर सीएनजीचे दर 1.50 रुपये प्रति किलो प्रमाणं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत हा निर्णय 8 एप्रिलच्या आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासू लागू होईल. महानगर गॅस लिमिटेडनं बदललेल्या दरानुसार पीएनजीसाठी 49 रुपये प्रति SGM असेल. तर सीएनजीचे दर देखील वाढवण्यात ले असून ते 79.50 रुपये असतील. सीएनजीचे दर 79.50 रुपये प्रति किलो असेल.
महानगर गॅसनं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या दरांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे 47 टक्के आणि 12 टक्के स्वस्त आहे. महानगर गॅसच्या ग्राहकांनी बिलं भरण्याचं आवाहन केलं आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आणि गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं मुंबईतील प्रवास महागण्याची शक्यता आहे.
महागनर गॅस लिमिटेडच्या निर्णयानंतर आज मध्यरात्री 12 पासून नव्या दरानं प्रमाणं सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना खरेदी करावा लागेल नव्या दरानं सीएनजीची विक्री केली जाईल. एक किलोग्राम सीएनजी 79.50 रुपये द्यावे लागणार आहेत. पाईपलाईन गॅसद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसचा दर 49 रुपये प्रति यूनिट असेल. याबाबतची माहिती एमजीएलकडून देण्यत आली आहे. आमच्या सर्व बहुमूल्य ग्राहकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असं महानगर गॅस लिमिटेडनं म्हटलं आहे.
एमएमआर रिजनमध्ये मोठ्या संख्येनं रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं सीएनजीवर चालतात. त्यामुळं सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा भाडं देखील वाढवण्यात यावं अशी मागणी केली जाऊ शकते. दरम्यान. महानगर गॅसच्या वतीनं लोकांना सांगण्यात आलं की ते स्वच्छ,पर्यावरणातील चांगले बदल याचा वापर करत आहेत.