Shraddha Kapoor Smile : 'श्रद्धाचं हसणं तर चेटकिणीसारखं'... श्रद्धा कपूरबद्दल दिग्दर्शक अमर कौशिकचं वक्तव्य, नेटकरी म्हणाले...'हे बोलताना जरा...'
esakal April 07, 2025 02:45 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर हिची ओळख आहे. दरम्यान श्रद्धाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या दिसण्याचा आणि आवाजाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. खऱ्या आयुष्यातही ती सर्वसामान्य लोकांसारखी राहते. तिचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव प्रत्येकांना भावतो.

श्रद्धा कपूर हिचं दिसणं तसंच तिचं हसणं सुद्धा प्रेक्षकांना फार भावतं. दरम्यान नेहमी हसत राहणाऱ्या श्रद्धाबद्दल 'स्त्री 2' चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलेली कमेंट प्रेक्षकांना तसंच श्रद्धांच्या चहात्यांना खटकली आहे. त्यांनी अमर कौशिक यांच्या व्हिडिओवर कमेंट करत त्यांना सुनावलं आहे.

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल माहिती देताना अमर कौशिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते श्रद्धाबद्दल म्हणाले की, 'श्रद्धा हिच्या कास्टिंगचं श्रेय पूर्णपणे दिनेश विजयन यांना जातं. त्या दोघांची भेट एका प्रवासादरम्यान झाली. त्यावरून दिनेश यांनी श्रद्धा चेटकिणीसारखे हसते असं म्हटलं होतं'

दरम्यान अमर कौशिक यांनी शोमध्ये दिनेश यांच्या वक्तव्याची आठवण करुन देत ''श्रद्धा चेटकिणीसारखे हसते' असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी श्रद्धाची माफीही मागितली. परंतु दिनेश यांनी हा किस्सा मजेशीर किस्सा म्हणून शेअर केला. परंतु श्रद्धाच्या चाहत्यांना ते फारसं आवडलेलं नाही. चाहत्यांनी व्हिडिओला कमेंट्स करत म्हटलय की, 'हे अव्यवहारी वागणं आहे.' तर दुसऱ्याने म्हटलंय की, 'एखाद्याबद्दल असं बोलणं वाईट आहे.'

दरम्यान अमर कौशिक यांना त्यांचं वक्तव्य प्रचंड महागात पडलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोक त्यांना ट्रोल करत आहे.

]]> IPL 2025: SRH ची तगडे बॅटर्स पुन्हा फेल! गुजरातच्या गोलंदाजांनी १५० धावांसाठीही तरसवलं https://www.esakal.com/krida/ipl/ipl-2025-srh-vs-gt-sunrisers-hyderabad-set-153-runs-to-win-for-gujarat-titans-mohammed-siraj-4-wickets-psk96 https://www.esakal.com/krida/ipl/ipl-2025-srh-vs-gt-sunrisers-hyderabad-set-153-runs-to-win-for-gujarat-titans-mohammed-siraj-4-wickets-psk96#comments 379275fe-6a34-4dd0-bb95-fde164c4321f Sun, 06 Apr 2025 21:14:31 +0530 2025-04-06T21:14:31.149+05:30 Pranali Kodre /api/author/1932506 IPL,Sunrisers Hyderabad,Gujarat Titans Mohammed Siraj | IPL 2025 SRH vs GTIPL

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने गुजरातसमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात गुजरातसाठी पुन्हा एकदा मोहम्मद सिराज चमकला आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सलामीला फलंदाजी केली.

पण, पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा मोठा अडथळा मोहम्मद सिराजने दूर केला. त्याने हेडला साई सुदर्शनच्या हातून ८ धावांवर झेलबाद केले.

त्यानंतर अभिषेकला इशान किशन साथ देत होता. पण ५ व्या षटकात अभिषेक शर्मालाही सिराजनेच राहुल तेवतियाच्या हातून १८ धावांवर बाद केले. इशान किशनही फार काही करू शकला नाही, त्याला १७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने इशांत शर्माच्या हातून झेलबाद केले. तरी त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला.

त्यांना मोठ्या धावा मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी घेऊ दिल्या नव्हत्या. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी धीम्या गतीने होत होती. नितीश आणि क्लासेन यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. पण त्यानंतर लगेचच क्लासेनला २७ धावांवर साई किशोरने १४ व्या षटकात क्लिन बोल्ड केले. नितीशलाही १६ व्या षटकात ३१ धावांवर साई किशोरनेच बाद केले.

त्याचा झेल रशीद खानने घेतला. कामिंडू मेंडिसलाही १ धावेवरच प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. अनिकेत वर्माचा मोठा अडथळाही सिराजनेच १९ व्या षटकात पायचीत पकडले. अनिकेत १८ धावांवर बाद झाला. याच षटकात त्याने इम्पॅक्ट सब्स्टिट्युट म्हणून मैदानात आलेल्या सीमरजीत सिंगलाही त्रिफळाचीत करत हैदराबादला आठवा धक्का दिला.

तरी शेवटी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या काही आक्रमक शॉट्समुळे संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. हैदराबादने २० षटकात ८ बाद १५२ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स ९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २२ धावांवर नाबाद राहिला. मोहम्मद शमी ६ धावांवर नाबाद राहिली.

गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात या ४ विकेट्स घेताना १७ धावाच खर्च केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.