चेतन व्यास, साम टीव्ही
एकीकडे आपण आझादी का अमृत महोत्सव बड्या दिमाखानं साजरा करत आहोत आणि दुसरीकडे कधीकाळी अनुभवलेलं अस्पृश्य पण आजही दिसून आल्याची धक्कादायक घटना भाजपच्या माजी खासदारासोबत घडली आहे. यामुळे सर्वत्र संतापाची प्रतिक्रिया उ मठत आहे. येथील देवळी गावात असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये राम नवमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव उत्सव सुरू होता.
यावेळी माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी शोभा तडस दोघेही मंदिरात दर्शनासाठी गेले आणि गर्भगृहात दर्शन करण्यासाठी ते पुढे गेले आणि त्यांना अडवले. तुम्ही गर्भगृहात दर्शन घ्यायला जाऊ शकत नाही असे आश्चर्यचकित वक्तव्य केले.
रामदास तडस आणि त्यांचा परिवार दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने या मंदिरात जात असतात या वर्षी देखील तडस कुटुंब हे मंदिरा दर्शनासाठी गेले असताना मंदिराचे ट्रस्टी मुकुंद चौरीकर यांनी तडस दांपत्यांना तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. कारण तुम्ही पितांबरी आणि सोहळ धारण केलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला गर्भगृहात जाऊन दर्शन करण्याची परवानगी नाही असा धक्कादायक वक्तव्य मंदिराच्या ट्रस्टींनी केलं. यानंतर खासदार तडस यांनी मंदिराच्या गर्भगृहा बाहेर स्थित श्री संत गणपतराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन केले आणि ते तिथून माघारी फिरले.
या संदर्भात खासदार तडस यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली. रामदास तडस म्हणाले, मागच्या 40 वर्षांपासून या मंदिरात मी दर्शनासाठी जात आहे. हे मंदिर फार पुरातन आहे. या मंदिराची 200 एकर जमीन देखील आहे या ठिकाणी अनेक वाद आहे. हे जे पुजारी आहे तोच तिथे ट्रस्टी आहे. तो पुण्याला राहतो वर्षातून एकदा आज आला आणि आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखले. यावेळी कार्यकर्ते आणि गावकरी आक्रमक झाले होते पण वाद होऊ नये म्हणून मी शांतता घेतली आणि माघारी फिरलो अशी प्रतिक्रिया झालेल्या प्रकरणावर माजी खासदार रामदास तडस यांनी दिली.
या सर्व प्रकरणावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश कृष्णरामजी आचार्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.घटनेच्या वेळी मी प्रत्यक्ष तिथे उपस्थित नव्हतो. मात्र, मंदिरातील पुजाऱ्याला गाभाऱ्यात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, याचा अधिकार असतो. आमच्या मंदिरात गेल्या ४० वर्षांपासून अशी परंपरा आहे की बाहेरगावच्या व्यक्तींना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. कारण देवाला सोनं-चांदीचे दागिने अर्पण केलेले असतात. अशा परिस्थितीत सर्वांवर लक्ष ठेवणे कठीण होते, म्हणूनच ही नियमावली ठरवण्यात आली आहे.
वर्ध्यातील लक्ष्मीनारायण मंदिरातही अशीच परंपरा पाळली जाते. गाभाऱ्यात केवळ पुजाऱ्यालाच प्रवेश असतो. आमच्या श्रीराम मंदिरातही हाच नियम लागू आहे. त्यामुळे माजी खासदारांसोबत बरेच लोक एकत्र गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आम्ही त्यांना प्रवेश नाकारला.
खासदार आणि आमदार यांच्यासाठी मात्र आम्ही कोणतीही मनाई केलेली नाही. अशी प्रतिक्रिया मंदिराकडून देण्यात आली आहे.