Bollywood Actress : शारीरिक संबंध एन्जॉय करण्यासाठी, महिलांना हे माहीतच नाही, बॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
Saam TV April 07, 2025 04:45 AM

बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये दिसणारी अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बोल्ड विधानासाठी चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री नीना गुप्ता यांनी शीरीरिक संबंधावर भाष्य केलं. भारतातील ९५ टक्के महिलांना शारीरिक संबंध एन्जॉय करण्यासाठी असतो, हे माहीत नाही. नीना गुप्ता यांनी मुलाखतीत स्वत:च्या वयावरही भाष्य केलं.

लिली सिंगला नीना गुप्ता यांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी नीना गुप्ता यांनी तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 'शारिरीक संबंध हा शब्द कुजबुज करत उच्चारायचे. आता मला तसे काही वाटत नाही. मला वाटते की, मी या विषयाला अधिकच महत्व देते.बाबतीत मला वाईट वाटतं'.

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ' अनेक भारतीय महिलांना वाटतं की, शारिरीक संबंध केवळ पुरुषांना आनंद देण्यासाठी किंवा अपत्यांना जन्म देण्यासाठी असतात. बहुतांश महिलांना माहीतच नाही की, शारिरीक संबंधाचा आनंद स्रियांनाही मिळतो. महिलांना वाटतं की, पुरुषांना आनंदात ठेवण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी शारिरीक संबंध महत्वाचे असतात'.

या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी स्वत:चं वय सांगण्यास नकार दिला. मुलाखतीत नीना गुप्ता यांना वयाबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावेळी नीना गुप्ता म्हणाल्या, 'मी माझं सांगणार नाही. कारण मी माझ्या वयापेक्षा तरुण दिसते. परंतु मला वृद्ध महिलेच्या भूमिका मिळतात. आता मी माझं वय सांगितलं तर नंतर काय ऑफर येईल, माहीत नाही. त्यामुळे मी व्यावसायिक कारणांसाठी माझं वय सांगणार नाही'.

नीना गुप्ता यांच्या करिअरविषयी बोलायचं म्हटलं तर, त्यांनी १९८२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नीना गुप्ता या त्यांच्या फिल्मी करिअरऐवजी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. 'पंचायत' सिनेमामुले नीना गुप्ता यांच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीत वाढ झाली. भारतात नीना गुप्ता यांच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.