एकीकडे लाडक्या बहिणी एप्रिलच्या (Ladki Bahin Yojana) हप्त्याची वाट बघत आहे तर दुसरीकडे योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहे. लाडकी बहीण योजनेत ६५ महिलांची माहिती घेत त्यांच्या नावाने परस्पर कर्ज काढण्यात आले आहेत. मानखूर्दमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये एका व्यक्तीने ६५ महिलांच्या नावाने २० लाखांचे कर्ज काढले आहे.
आरोपीने २० लाखांचे कर्ज काढले होते. २० आयफोन खरेदी करण्यासाठी त्याने हे कर्ज घेतले. यानंतर त्याने या फोनची विक्री करुन ६५ महिला व संबंधित वित्तसंस्थेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. मानखुर्द पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.
मध्ये (Mankhurd) ६५ महिलांनी कर्जाची रक्कम न भरल्याने संबंधित वित्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महिलांची भेट घेतली. यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शंकर घाडगे, पद्मा कांबळे, सुलोचना दिवणाजी, सोनल नांदगावकर यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगून त्यांची माहिती घेतली.
तब्बल ६५ महिसलांची माहिती घेतली. त्यांच्याकडून (Aadhaar Card), पॅन कार्ड, पासबुक ही सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्या वित्तसंस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कुर्ला आणि अंधेरी येथील आयफोन गॅलरीत नेण्यात आले.
यानंतर तिथे त्या महिलांच्या कागदपत्रांच्या आधारे आयफोनसाठी २० लाखांचे घेण्यात आले. हे आयफोन त्याने पुढे इतर व्यक्तींना विकले. याप्रकरणी पोलिस आता तपासणी करत आहेत.