पुण्यात वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार; ‘ते’ पाहून मालकाला आला संशय, परिसरात संतापाची लाट
Marathi April 12, 2025 07:24 AM

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी चक्क स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. आता, पुन्हा एकदा असाच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. हडपसर (Pune) परिसरात एका विकृत माणसाकडून चक्क कुत्र्यावरच अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता त्याच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित कुत्र्याचे मालक घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागल्याने मालकाला शंका आली. त्यानंतर त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा अमानवी प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने श्वान मालकाच्या कुटुंबीयांत आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा

बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघाताने नाही, वैद्यकीय अहवालातून समोर आलं वेगळच कारण

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.