लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला अक्षय्य तृतीयेचे मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार असे महिला आणि बाल विकास खात्याकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. दरम्यान, लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केले आहे. भुजबळ म्हणाले, राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या हफ्त्याचे पैसे हे शासनाचे पैसे आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढे ढकललेल्या हप्तावर भाष्य केले आहे.
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता गुढीपाडव्याला मिळणार असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षय तृतीयाला देण्यात येणार असं सांगण्यात आलं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, अक्षय तृतीयाला देणार असे सांगितले ना तर देणार ना. शेवटी आपल्या खिशात जे पैसे येतात कमाई जी असते ती ठरलेली असते. मात्र त्यात एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर खर्च जे नेहमीचे आहेत ते करताना ओढाताण होते. हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं. सरकारचे पैसे आहेत ते कुठे जाणार नाही मिळणार असल्याचे म्हणत लाडक्या बहिणींना भुजबळांनी अश्वस्त केलं.