भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते.
आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत यश मिळवले. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशाच काही गोष्टी पुढे दिल्या आहेत त्या जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्ये दिली. त्यांचा विश्वास होता की प्रत्येकाने एकमेकांशी आदराने वागावे आणि सगळ्यांना सामान संधी मिळाव्यात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जातीभेद, अन्याय आणि अस्पृश्यतेविरोधात लढ दिला. महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर चळवळ हे त्यांच्या संघर्षामचे प्रतीक आहेत.
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हे त्यांचे ब्रीदवाक्य शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकते. शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे, असं ते मानायचे.
त्यांनी दाखवून दिले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीने यश मिळवता येते.