काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सह त्यांच्या कौटुंबिक सदस्यांवर ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे याचा निषेध प्राणपणाने करण्यासाठी उद्या काँग्रेसचे कार्यकर्ते देशव्यापी आंदोलन करणार आहेत. देशात जेथे ईडीची कार्यालये आहेत तेथे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भातील सर्व प्रदेश काँग्रेस समितीच्या सर्क्युरल जारी करीत उद्या बुधवारी होणाऱ्या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची जमाव जमव करण्यास सांगितले आहे.
काँग्रेसच्या प्रदेश समितींनी आपापल्या राज्यातील ईडी ( सक्तवसुली संचालयाच्या ) कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमवून निदर्शने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.काँग्रेसला राजकीय हेतूने निशाणा बनवले जात असून याचा पक्ष मोठ्या धैर्याने सामना करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग केसमध्ये ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या ओव्हरसिज प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या विरोधात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात प्रॉसिक्युशन कम्प्लेंट ( चार्जशिट ) दाखल केली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्रात सुमन दुबे आणि अन्य लोकांची नावे देखील सामील केली आहेत.
चार्जशिटवर आता कोर्टाकडून दखल घेण्याची पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवली आहे. या प्रकरणात आधीच ईडीने ६४ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ईडीद्वारा राहुल, सोनिया गांधी आणि अन्य लोकांच्या विरोधात PMLA च्या कलम ४४ आणि ४५ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यात आरोपींनी कलम ३ नुसार मनी लॉड्रींगचा गुन्हा केला आहे.
ईडीला आदेश दिले आहेत की तक्रार आणि संबंधित कागदपत्रांची चांगल्या प्रतीची कॉपी आणि ओसीआर (रीडेबल) प्रत पुढच्या सुनावणीच्या आधी दाखल करावी. काँग्रेसच्या नेत्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह करीत केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.