भिवंडीतील बेपत्ता पॉवरलून व्यावसायिकाची हत्या, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
Marathi April 16, 2025 02:37 AM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="ठाणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/thane" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">ठाणे : भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपीने शेख यांच्या व्हॉट्सअॅपवरुन कुटुंबीयांकडून तीन लाखांची खंडणीही मागितल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. 

भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात राहणाऱ्या पावरलूम व्यवसायिक फरहत अखलाक शेख 12 एप्रिल, शनिवार रोजी घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. मात्र मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग रिपोर्ट दाखल केली. शांतीनगर पोलिस मिसिंग रिपोर्टच्या आधारे तपास घेत असतानाच कुटुंबीयांना मयताच्या व्हाट्सअपवरुन एक मेसेज आला आणि तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेला फरहत शेख यांचा मृतदेह भिवंडी पोलिसांना कारिवली गावच्या जंगलात मिळाला. हा मृतदेह चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला .

सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती  

फरहत शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ येथील रहिवासी असून ते भिवंडीतील गैबीनगर परिसरात पत्नी व चार मुलींसह राहत होते. ते पॉवरलूम व्यवसाय आणि बिल्डरचे काम करायचे. फरहत शेख हे आपल्या स्कूटरवरुन एका पिवळा शर्ट घातलेल्या तरुणासोबत कारिवली गावाच्या दिशेने गेले होते असं पोलिस तपासामध्ये समोर आलं. त्याचा सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागला.

व्हॉट्सअॅपवरुन मेसेज, लोकेशन बदलले 

दरम्यान, फरहत शेख यांचे मोबाईल सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज केले जात होते. सुरुवातीला त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले गेले. नंतर 80 हजार रुपयांची मागणी झाली. ही रक्कम नंतर तीन लाखांपर्यंत गेली. सर्व चर्चा ही मेसेज स्वरूपात झाली आणि पैशाची मागणी करण्यात आली. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील झोपडपट्टीत तो मोबाईल वापरला जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागल. पोलिस तिथे पोहोचले, मात्र आरोपी सतत लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत आहे.

शेवटी चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर फरहत शेख यांचा मृतदेह कारिवली गावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.