मुरबाड (वार्ताहर)ः ग्रामपंचायत कार्यालय, रायते यांच्याकडून हनुमान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आदर्श सरपंच राज्य पुरस्कार प्राप्त सरपंच समिता सुरोशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर माजी सरपंच तथा शिवसैनिक संतोष सुरोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे, उपसरपंच मयूर सुरोशी, सदस्य हरेश पवार, यतीन बुटेरे, सुभाष जाधव, उमेश दोंदे, कर्मचारी मानसी देसले, मनीषा जाधव, नारायण सुरोशी, पंढरीनाथ पवार, जयवंती पवार उपस्थित होते.