बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात आज किटी आडगाव (ता. माजलगाव) ग्रामपंचातयीचे सदस्य बाबूराव आगे यांचा भाजप कार्यालयासमोरच सपासप वार करून खून करण्यात आला आहे. या मुळे माजलगावसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Chandrakant Khaire : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे म्हणाले 'आता सगळं ओके झालंय'विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माझ्या वाद कुठे होता. आता सगळं ओके झालंय. दानवे हे माझ्यापेक्षा लहान आहेत, त्यामुळे गळाभेट तर केव्हाही होऊ शकते, असे विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले.
Aaditya Thackeray News : सरकारवर टीकाएसटी कर्मचाऱ्यांना ५६% च पगार दिला जात असल्याचं गेल्या आठवड्यात आपण पाहिलंच, तसंच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असं दिसतंय. परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापूरात म्हणाले तसं मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे. ह्यातून काय दिसतंय? निवडणुक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं हे सरकार जनतेचं भलं करणारं सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
Vaibhav Naik News : निलेश राणेंवर गंभीर आरोपकुडाळमधील सिध्दीविनायक बिडवलकर यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट निलेश राणेंवर आरोप केला आहे. आरोपी सिध्देश शिरसाटला वाचवण्याचा निलेश राणे यांचा प्रयत्न आहे. हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत शिरसाटचा प्रवेश झाल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.
Cabinet Meeting : नगराध्यक्षांना बहुमताने हटवणारआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यापैकी एक निर्णय म्हणजे नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्यात आणखी एक आघाडी? हे तीन बडे नेते एकत्रमहाराष्ट्राचे राजकारणात गेल्या काही वर्षांत खूप मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे. विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने हे तीन बडे नेते एकत्र येणारे आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे.
UBT Camp Nashik : आदित्य ठाकरे आज सायंकाळी नाशिकमध्येनाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाचे १६ एप्रिलला शिबीर आहे. नाशिकमधील शिबीराबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे हे आजच नाशिकमध्ये सायंकाळी येणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे उद्या दुपारी नाशिकला येतील. त्यांच्या उपस्थितीत शिबीराचा समारोप होईल. तर आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
BJP : राज्यसभेत भाजपची वाढली ताकदभाजपने अण्णा द्रमुक पक्षासोबत युती केल्याने राज्यसभेत भाजपची ताकद वाढली आहे. आणखी चार खासदार आता एनडीएमध्ये सामील झाले आहेत.
Satara : शिवरायांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत... उदयनराजे कडाडले!राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनातील 40 एकर जागेत व्हावे अशी मागणी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Maharashtra Government : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, नाराजीच्या चर्चांचं सावटराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चैत्यभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करू न दिल्याबद्दल ते नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.
Tanisha Bhise Death Case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील आणखी एक अहवाल आज समोर येणारतनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील आणखी एक अहवाल आज समोर येणार आहे. दीनानाथ रुग्णालयाने हलगर्जीपणा केला की नाही याचा उलगटडा यातून होण्याची शक्यता आहे.
Sanjay Ghatge joins BJP : संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणारशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार संजय घाटगे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात मंगळवारी (ता.15) दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहेत.
Tuljapur drugs case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणारतुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल होणार आहे. या प्रकरणी 14 आरोपी तुरूंगात आहेत. तर 21 आरोपी अद्याप फरार आहेत.
Deenanath Hospital : दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत दोन दिवसांत सुनावणीपुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत दोन दिवसांत सुनावणी होणार आहे. थकीत रक्कम जमा न केल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचा इशारा पुणे महानगरपालिकेने दिला आहे.
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न - शिरसाटउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपने ठाकरेंना प्रवेशबंदी केली असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.
Mahayuti Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठकराज्य मंत्रिमडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता.