पुण्यात मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केले आहे. अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाला अजित पवार यांना बोलवणार नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाला आम्हाला अमित शाह अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार आहोत आणि इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना त्या-त्या वेळी निमंत्रण देऊ… पण अजित पवार यांना बोलवणार नाही.’, असं स्पष्ट म्हटलंय. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार हे सरकारमधील एक आहे तरी बोलवणार नाही का असा सवाल केला. यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, हा कार्यक्रम सरकारचा नाही….