IPL 2025 vs Sunrisers Hyderabad: दीपक चहरच्या पहिल्याच षटकात दोन सोपे झेल टाकले गेले. हे कमी होतं की काय क्षेत्ररक्षणातही चूक झाली आणि ते पाहून चाहत्यांसह मालकीण निता अंबानी ( Nita Ambani) पण अचंबित झाल्या. खराब सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीवर अंकुश ठेवले आहे.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय हा पहिल्याच षटकात सार्थकी लागला असता. व ट्रॅव्हिस हेड या दोन्ही स्फोटक फलंदाजांना अनुक्रमे विल जॅक्स व कर्ण शर्मा यांनी झेल सोडून जीवदान दिले. MI चं क्षेत्ररक्षण पाहून दीपक चहर अक्षरशः संतापला होता. जीवदान मिळाल्यानंतर दोन्ही फलंदाजांकडून सावध खेळ झाला. मुंबईच्या गोलंदाजांनीही संथ मारा करून त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते.
चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणून MI ने हैदराबादवर दडपण टाकले. हैदराबादला पॉवर प्लेमध्ये ४६ धावा करता आल्या. आठव्या षटकात हार्दिक पांड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. अभिषेक २८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४० धावांवर बाद झाला. त्याच षटकात बॅकवर्ड पॉइंडवर हेडची विकेट मिळाली असली, परंतु ट्रेंट बोल्टने झेलसाठी उशीरा डाईव्ह मारली अन् ते पाहून मालकीण निता अंबानी यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.
मुंबई इंडियन्स - रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा
सनरायझर्स हैदराबाद - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
दरम्यान, पहिल्या षटकात दोन झेल टाकल्यानंतर मुंबईच्या क्षेत्ररक्षकांकडून आणखी एक चूक झाली आणि ती पाहून हसावं की रडावं हेच चाहत्यांना नाही कळलं. नमन धीरने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विल जॅक्सकडे चेंडू फेकला, परंतु तो एवढा उंच होता की जॅक्सला तो झेलता आला नाही आणि हैदराबादला एक अतिरिक्त धाव मिळाली. त्यानंतर दहाव्या षटकात हार्दिकने ट्रॅव्हिस हेडला झेलबाद केलेच होते आणि जल्लोषही झाला. पण, तो No Ball ठरला अन् अंबानी यांनी पुन्हा एकदा कपाळावर हात मारला.
५४५ - आंद्रे रसेल
५७५ - ट्रॅव्हिस हेड
५९४ - हेनरिच क्लासेन
६०४ - वीरेंद्र सेहवाग
६१० - ग्लेन मॅक्सवेल
६१५ - ख्रिस गेल
६१७ - युसूफ पठाण- सुनील नरीन
६२८ - लिएम लिव्हिंगस्टोन