मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक कायमचा बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक कायमचा बंद जरी होणार असला तरी रेल्वे प्रवाशांसाठी दुसरा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक ऐवजी आता १-ए या प्लॅटफॉर्मवरून लोकल ट्रेन सुटणार आहे. आज रात्री १२ ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकात ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील अप आणि डाऊन मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेन सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.