नागपुरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सहा तरुणांकडून शनिवारी सायंकाळी ६ वाजता अंकूश कडू यांची हत्या करण्यात आली. तरुणांनी रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर धारधार शस्त्राने त्यांच्यावर करत हत्या केली. कडू यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येची घटना घडली आहे. म्हाडा चौकात माजी उप जिल्हाप्रमुख अंकूश कडू यांची हत्या करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून कडू यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. हत्या करणारे ६ तरुण फरार झाले आहेत.
अंकुश कडू यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणांनी कडू यांची हत्या का केली, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर हत्येचं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना वाढताना दिसत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासन अलर्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलीस प्रशासन सतर्क झालंय. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी अचानक शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अकंश कडू यांच्या हत्येची घटना घडल्याने खबबळ उडाल आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस प्रशासनाने या संदर्भात पुढील तपास सुरु केला आहे.