माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी
झिशान सिद्दिकी यांना डी कंपनीच्या नावाने ई-मेलद्वारे जीवे मारण्याीच धमकी
21/4/2025 22:35:46
पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचा परवाना रद्द
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना केला रद्द
21/4/2025 22:35:10
मानखुर्द येथे झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका मुलीचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
मानखुर्दच्या हनुमान मंदिराजवळील जनता नगर येथील झोपडपट्टीत रात्री 8 वाजता लागली आहे
या आगीत 10 वर्षीय खुशी खानचा मृत्यू, तर 25 वर्षीय फराह खान 70 टक्के भाजल्याने गंभीर जखमी
21/4/2025 22:25:25
नक्षलविरोधी मोहिमेत 8 नक्षलवादी ठार
झारखंडच्या बोकारोमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक
21/4/2025 21:23:52
केरळ राज्य लॉटरीच्या अभ्यासासाठी समिती
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून समिती स्थापन
21/4/2025 20:50:7
नागपुरात भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजपाचं आंदोलन
21/4/2025 17:50:24
नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी हमीद इंजिनिअरला जामीनावर सोडण्याचे आदेश
50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटकेचे आदेश
हिंसाचार प्रकरणी फहिम खानच्या जामिनावर 23 एप्रिल रोजी सुनावणी
21/4/2025 17:49:57
सर्वोच्च न्यायालयाचा नाशिक महापालिकेला दिलासा
नाशिकच्या सातपीर दर्ग्याप्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली
याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई केल्याचे निदर्शनास
दर्गा ट्रस्टला नव्याने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला
21/4/2025 16:47:32
पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन
व्हॅटिकन सिटीमधील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास
21/4/2025 13:38:17
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौंसिलसमोर आज सुनावणी
डॉ. सुश्रुत घैसास आणि भिसे कुटुंबीय सुनावणीस हजर राहणार
21/4/2025 12:55:9
बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर
महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या सहआरोपींना सात वर्षांची शिक्षा
शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याने दोन सहआरोपींची होणार सुटका
पनवेल सत्र न्यायालयाने सुनावली तिघांना शिक्षा
21/4/2025 11:45:8
नाशिक दर्गा कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
काठेगल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा आणि बांधकामावर मनपाने केली होती कारवाई
21/4/2025 10:45:4
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरच्या अटकेबाबत आज सुनावणी
खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयालयात होणार निर्णय
21/4/2025 9:54:28
हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध
निर्णय घेताना राज्य सरकारने विचारात घेतले नाही
समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप
जीआर रद्द करण्याबाबत देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
21/4/2025 9:35:47
पुण्यातील साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AI वापरासंदर्भात बैठक सुरू
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एनसीपी एसपीचे प्रमुख शरद पवार उपस्थित
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची बैठकीला हजेरी
21/4/2025 9:0:31
बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला आज शिक्षा ठोठावणार
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरण
अभय कुरुंदकर याच्यासह अन्य दोघे दोषी
पनवेल सत्र न्यायालयामध्ये सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार
21/4/2025 8:46:11