Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातल्या बालाघाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन आदिवासी मुलींवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. सात जणांनी हे दुष्कृत्य केल्याची माहिती आहे.
पीडित मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. घटनेतील सर्वच्या सर्व सात आरोपींना बालाघाट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलमांखाली सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.