इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने ५ विकेट्सने विजय मिळवला.
हैदराबादने पहिल्यांदाच चेपॉक स्टेडियमवर विजय मिळवला आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये एकदाही हैदराबादला या मैदानात विजय मिळवता आलेला नव्हता. चेन्नईचा मात्र घरच्या मैदानात हा सलग चौथा पराभव आहे. चेन्नई सलग चौथ्यांदा घराच पहिल्यांदाच पराभूत झाली आहे.
या सामन्यात चेन्नईने हैदराबादने १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग हैदराबादने १८.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. हैदराबादकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. कामिंडू मेंडिस, हर्षल पटेल आणि इशान किशन यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.
सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे सलामीला फलंदाजीला उतरले होते, पण दुसऱ्याच चेंडूवर खलील अहमदने त्याला आयुष म्हात्रेच्या हातून झेलबाद केले. नंतर हेडला इशान किशन साथ देत होता. परंतु, सहाव्या षटकात अंशुल कंबोजने हेडला १९ धावांवर त्रिफळाचीत केले.
९ व्या षटकात क्लासेनचा अडथळा रवींद्र जडेजाने दूर केला. तो ७ धावांवर बाद झाला. मधल्या षटकांमध्ये जडेजाने चांगली गोलंदाजी केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी फार धावाही दिल्या नव्हत्या. तरी इशान किशनला अनिकेत वर्माने साथ दिली.
पण अखेर १२ व्या षटकात इशान किशनचा शानदार झेल बाऊंड्री लाईनजवळ सॅम करनने घेतला. इशान किशनने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. १४ व्या षटकाच अनिकेत वर्माही १९ धावांवर नूर अहमदविरुद्ध खेळताना दीपक हुडाच्या हातून झेलबाद झाला.
पण नंतर नितीश कुमार रेड्डी आणि कामिंडू मेंडिस यांनी डाव सावरला. त्यांनी संयमी खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. कामिंडू मेंडिस २२ चेंडूत ३२ धावांवर नाबाद राहिला. नितीश कुमार रेड्डीने नाबाद १९ धावा केल्या.
चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. खलील अहमद, अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. चेन्नईचा संघ १९.५ षटकातच १५४ धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली.
तसेच आयुष म्हात्रेने ३० धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा (२१), दीपक हुडा (२२) आणि शिवम दुबे (१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.