UPSC Success : मेंढरं सांभाळणारा झाला आयएएस, बिरू साहेब होताच महाराष्ट्रात सोशल मीडियावर त्याची वाढली क्रेझ
esakal April 26, 2025 10:45 AM

गेवराई : नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत मेंढरं सांभाळाणा-या बिरुने यश संपादन करून आयएएस पदाला गवसणी घातली आहे.यामुळे बिरुची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढली असून, आजच्या युवकासमोर त्याने एक आदर्श उभा केला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यमगे (ता. कागल ) येथील बिरदेव डोणे याने देशात ५५१ वी रैंक पटकावत यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अक्षरशः सोशल मीडियावर बिरदेव वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून.मेंढपाळ करणा-या तरूणाची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे.

त्याचा आदर्श घेऊन तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कोण आहे बिरू

कर्नाटकातील बेळगाव येथे मेंढरं राखण्यात रमून गेलेले खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी ठेवून नियमित पुस्तकांचे वाचन व अभ्यासातील जीव ओतल्याने यशाला गवसणी घातली, विरदेव डोणे बोलताना यांनी व्यक्त केले. आई वडिलांनी व भावाने दिलेली साथ आणि धैर्य यामुळेच यश मिळाल्याचेही त्याने सांगितले.

दहावीत ९६ टक्के, बारावी ८९ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याबरोबरच पुणे येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोन परीक्षेत अपयश येऊन देखील न खचता त्याने तिस-या वेळेस यश संपादन केलेच, बिरूदेव डोणे याने मेंढी माऊलीला उचलून घेऊन आपला आनंदोत्सव साजरा केला.

डाक सेवक म्हणून केले होते काम

गंगापूर(ता. भुदरगड)या ठिकाणी डाक सेवक म्हणून दहा महिने नोकरी केली. परीक्षेचा निकाल आहे, पण कधी लागेल याची माहिती नसणाऱ्या बिरूला त्याच्या मित्राने फोन करून 'भावा, तू जिंकलास, तुझं नाव लिस्टमध्ये आहे' असा फोन केला. यावेळी बिरू आपल्या मेंढराच्या लोकर कापणीत व्यस्त होता.

मेंढरा मागें फिरणारं पोरगं साहेब होताच महाराष्ट्रात सोशल मिडियावर वर्षाव व सुरु झाला

मेंढर चारता चारता भटकंती करणारं पोरं बिरु साहेब झाला अण् सारा गाव आनंदात न्हाऊन निघाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,शिका संघटित व्हा संघर्ष करा या बिद्र वाक्यांचा मनांवर ठसा उमटवून अठरा विश्व दारिद्र्य असणार पोरं जेव्हा महाराष्ट्र मधून ५५१वी रॅक पटकवत यशाला गवसणी घालतो तेव्हा आभाळ ही छोट वाटतं अशा विविध शुभेच्छांच्या पोस्ट सोशल मिडियावर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असल्याने बिरू डोणेची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.